चालू घडामोडी २०१६, ९ जानेवारी २०१६ चालू घडामोडी, लोक सेवा आयोग, राज्य लोक सेवा आयोग, एम.पी.एस.सी,यु.प

Posted  on 2016-01-16
Video for Download and View   चालू घडामोडी २०१६, ९ जानेवारी २०१६ चालू घडामोडी, लोक सेवा आयोग.webm
चालू घडामोडी २०१६, ९ जानेवारी २०१६ चालू घडामोडी, लोक सेवा आयोग, राज्य लोक सेवा आयोग, एम.पी.एस.सी,यु.पी.एस.सी,Current Affairs January 2016,

१)मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधना नंतर सरकार निर्माणाला उशिर होत असल्यामुळे जम्मु-काश्मीर मध्ये ९ जानेवारी २०१६ ला रात्री पासून राज्यपाल शासन लागु केले.
राज्यपाल एन एन व्होरा यांनी जम्मु-काश्मीर च्या संविधाना अनुच्छेद ९२ नुसार राज्यामध्ये राज्यपाल शासनाची उद्घोषणा केली. जम्मू-काश्मीर मध्ये राज्यपाल शासन यापुर्वी मार्च १९७७, मार्च १९८६, ऑक्टोबर २००२, जुलै २००८ व जानेवारी २०१५ या साली लागु केले होत.

२) चीन सरकारने सोन्याने बनलेली १२० फुटाची माओत्से तुंग यांची मुर्ती अचानक पाडली.
या मुर्तीला बनविण्यासाठी जवळ जवळ ३३ करोड रुपये खर्च झाला होता. हेनान क्षेत्रातील काइफेंग मधील काउंटी येथे ही मुर्ती बनविली गेली होती.माओत्से तुंग मॉडर्न चीनचे फाउंडर मानले जातात.२६ डिसेंबर १८९३ ला त्यांचा जन्म व मृत्यू ९ सप्टेंबर १९७६.

३) साहित्यकार रिवद्र कालिया यांचे निधन
िहदी चे साहित्यकार ७६ वर्षीय रिवद्र कालिया यांचे निधन झाले.त्यांचा जन्म पंजाब मधील जालंधर मध्ये झाला. कालीया याचंी खुदा सही सलामत है, एबीसीडी, १७ रानडे रोड हे उपन्यास, नौ साल छोटी पत्नी कहानी संग्रह, गालिब छटी शराब हे संस्मरण, नींद क्यो रात भर नही आती व्यंग संग्रह इत्याही प्रसिद्ध लेखन आहे.

४)जागतिक ग्रंथ प्रदर्शनास दिल्लीत ९ जानेवारी २०१६ पासून प्रारंभ
केंद्रिय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते या ४३ व्या ग्रंथ मेळ्याचे उद्घाटन झाले. प्रदर्शनात चीन पाहुणा देश म्हणून यंदाचा बहुमान मिळाला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या या ग्रंथ प्रदर्शनात ३० देश सहभागी झाले आहेत.चीनच्या सहभागाबद्दल गेल्यावर्षी चीनचे अध्यक्ष शि जिनिपग यांनी भारताच्या दौरा केला होता त्यावेळी पंतप्रधान मोदी व त्यांच्यात करार झाला होता.या प्रर्दशनाचा कालावधी ९ दिवस आहे. चिनच्या ५० प्रकाशन संस्थांनी यात भाग घेतला आहे. तसेच ५००० चिनी पुस्तकांचा या प्रर्दशनात समावेश आहे.

५) अर्जनचा पॉवर पंच: नव्या दारुगोळ्याची संशोधकांकडून यशस्वी चाचणी
भारताचा सर्वाधिक शक्तीशाली रणगाडा म्हणून ओळखल्या जाणाèया अर्जनसाठी तितकेच ताकदवान तोफगोळे तयार करण्यात आले असून, ९ जानेवारी २०१६ ला संरक्षण संशोधकांनी याची ओडीशातील चांदीपूर येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली.पुण्यातील डीआरडीओ च्या लॅबोरेटरीज आर्ममेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट आणि हाय एनर्जी मटेरिअल्स रिसर्च या संस्थानी हा दारुगोळा तयार केला आहे.दारुगोळ्याचे भारतातच मूल्यमापन करण्याची ही पहिलीच वेळ असून,यामुळे अर्जनचे बळ कित्येक पटीने वाढणार आहे.

६) सानिया- िहगीस अqजक्य
सानिया मिर्झा आणि मार्टिना िहगीस यांनी व्रिस्वेन आंतरराष्ट्रिय टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले. त्यांचा हा सलग २६ वा विजय आहे. जर्मनीच्या अँजेलिक केर्वर-अँड्रिया पेटकोविच या जोडीला ७-५,६-१ असे हरविले.सानिया व मार्टिना यांना विश्वविक्रमासाठी दोन सामने जिंकण्याची गरज आहे. गिगी फर्नांडेझ- नताशा इन्वेरेवा यांनी १९९४ मध्ये केलेला २८ विजयांचा विक्रम मोडण्याची त्यांना संधी आहे.


Dowload Android Apps From Play store.

Current Affairs 2016 January Marathi Android App Link