चालू घडामोडी २०१६, १० जानेवारी २०१६ चालू घडामोडी, Latest Current Affairs 2016 in Marathi, Current Affairs १० January 2016 in Marathi

Posted  on 2016-01-16
Video for Download and View   चालू घडामोडी २०१६, १० जानेवारी २०१६ चालू घडामोडी.webm
चालू घडामोडी २०१६, १० जानेवारी २०१६ चालू घडामोडी, Latest Current Affairs 2016 in Marathi, Current Affairs १० January 2016 in Marathi

१)गुजरातेत आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव सुरू
गुजरातमध्ये १० जानेवारी २०१६ रोजी २७ व्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाला अहमदाबादेतील साबरमती रिव्हर फ्रंट मैदानावर मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते १० जानेवारी २०१६ रोजी या महोत्सवाचे उद्घाटन झाले.
ब्रिटन, अमेरिका, जर्मनी, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम, कॅनडा, ब्राझील, कंबोडिया, चीन, नेदरलँड, स्वित्र्झलंड, युक्रेन, रशिया, फिलिपीन्स, अर्जेंटिना आदी देशांमधील हौशी पतंगबाज आणि तज्ज्ञ या महोत्सवामध्ये सहभागी झाले आहेत. देशातील महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, पंजाब, हरियाना, राजस्थान, तामिळनाडू या राज्यांमधील पतंगप्रेमीही या महोत्सवात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत.
गुजरातमधील पर्यटन विकासाच्या दरातही मोठी वाढ झाली आहे, मागील वर्षात गुजरातमधील पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊन ती १३.५ टक्कयांवर पोचली आहे.

२)रॉजर फेडररला उपविजेतेपद
कॅनडाच्या मिलोस राओनिकने धक्कादायक निकालाची नोंद करताना दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररला ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पध्रेत उपविजेतेपदावर समाधान मानण्यास भाग पाडले. राओनिकने ६-४, ६-४ अशा सरळ सेटमध्ये फेडररचा पराभव करत जेतेपदाला गवसणी घातली. १७ ग्रँड स्लॅम नावावर असलेल्या फेडररविरुद्ध गेल्या ११ सामन्यांतील राओनिकचा हा दुसरा विजय आहे.

३)संगीत सम्राट डेव्हिड बॉविए यांचे वयाच्या ६९ वर्षी निधन झाले.
या गायकाने गेल्या शुक्रवारी आपल्या वाढदिवशी नवीनतम अल्बम ब्लॅकस्टार प्रदर्शित केले. त्यांचा शेवटचा थेट प्रयोग २००६ मध्ये न्यूयॉर्क येथे एका चॅरिटी मैफिलमध्ये झाला होता. त्यांच्या शानदार हिट्स मध्ये लेट्स डान्स, स्पेस ऑडिटी, हीरोज, अन्डर प्रेशर, रिबेल, लाइफ ऑन मार्स, आणि सफ्फ्रगेट्टे सिटी यांचा समावेश आहे.


Dowload Android Apps From Play store.

Current Affairs 2016 January Marathi Android App Link