Bombay Police Act 1951 in Marathi, Section:63A, मुबंई पोलिस अधिनियम १९५१ कलम : ६३क , Bombay Police Act Marathi

Posted  on 2016-02-16

Bombay Police Act 1951 in Marathi, Section:63A, मुबंई पोलिस अधिनियम १९५१ कलम : ६३क , Bombay Police Act Marathi
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त तसेच सर्व स्पर्धा परिक्षांसाठी उपयुक्त. Useful for police Sub Inspector Departmental Examination and also all competitive exam and Law students.
प्रकरण पाच
सार्वजनिक सुव्यवस्था व राज्याची सुरक्षितता राखण्यासाठी विशेष उपाययोजना
तीन : शिबिरे, वगैरेचे नियंत्रण व गणवेष
कलम ६३क :
शिबीरे-संचालने वगैरेचे नियंत्रण व गणवेश वगैरेच्या उपयोगास मनाई करणे :

१) सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी तसे करणे आवश्यक आहे अशी राज्य शासनाची खात्री होईल तर, त्यास सर्वसाधारण qकवा विशेष आदेश काढून, संपूर्ण (महाराष्ट्र राज्यात) qकवा त्याच्या कोणत्याही भागात, हत्यारांचा उपयोग करण्याचे प्रशिक्षण घेण्याच्या qकवा दिले जाण्याच्या qकवा कवाईत करण्याच्या qकवा कवाईत करवून घेतली जाण्याच्या कारणांसाठी qकवा लष्करी कसरती, शिस्तबध्द हालचाली qकवा डावपेच यांची तालीम करण्याच्या कारणासाठी qकवा कोणत्याही शिबिरात, संचालनात qकवा मिरवणुकीत हजर राहण्याच्या qकवा ती भरविण्याच्या qकवा तीत भाग घेण्याच्या उपरिनिर्दिष्ट कारणासाठी भरणाèया व्यक्तींच्या सर्व सभांना qकवा जमावांना मनाई करता येईल qकवा त्यावर निर्बंध घालता येईल.
२) जर राज्य शासनाची अशी खात्री होईल की, याअन्वये काढावयाच्या आदेशात विनिर्दिष्ट करावयाच्या मंडळातील qकवा संस्थेतील qकवा संघटनेतील कोणत्याही व्यक्तीने, संघराज्याच्या सशस्त्र दलातील व्यक्तीने qकवा पोलीस दलातील qकवा त्या त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही विधिअन्वये रचना केलेल्या कोणत्याही दलातील व्यक्तीने परिधान करणे (घालणे) आवश्यक (भाग) असलेल्या कोणत्याही गणवेषासारखा qकवा गणवेषाच्या भागासारखा पोषाख qकवा अंगावर घालण्याची वस्तू सार्वजनिक ठिकाणी घालण्यामुळे राज्याच्या सुरक्षिततेस qकवा सार्वजनिक सुव्यवस्थेच्या कामात अडथळा(बाध) येण्याचा संभव असेल तर, राज्य शासनास, सर्वसाधारण qकवा विशेष आदेश काढून अशा मंडळातील, संस्थेतील qकवा संघटनेतील कोणत्याही व्यक्तीने असा कोणताही पोषाख qकवा परिधान करावयाची वस्तू सार्वजनिक ठिकाणी घालण्यास qकवा प्रदर्शित करण्यास मनाई करता येईल qकवा त्यावर निर्बंध घालता येईल.
३) पोट-कलम (१) व (२) खालील प्रत्येक सामान्य किंवा विशेष आदेश कलम १६३ खालील जाही नोटीस प्रसिद्ध करण्यासाठी ठरविलेल्या रीतीने प्रसिद्ध केला जाईल.
स्पष्टीकरण - पोट-कलम (२) च्या प्रयोजनांसाठी पोषाख qकवा परिधान करावयाची वस्तू जर असा पोषाख qकवा वस्तू जेथे लोकांना जाण्या-येण्याची मोकळीक आहे अशा कोणत्याही ठिकाणी घातला qकवा प्रदर्शित केली तर, सार्वजनिक ठिकाणी तो पोषाख अंगात घातला qकवा ती वस्तू प्रदर्शित केली असे समजण्यात येईल.

परिक्षेसाठी संपुर्ण ऑडियो अ‍ॅप खालील लिंक वरुन डाउनलोड करा.
Android App With Audio and Text Link

या वेबसाईट वर कायद्याविषयीची माहिती,नियम,अधिनियम व इतर केवळ अभ्यासाकरिता उपलब्ध केली आहे. तरी याचा कायदेशीर कोठेही वापर करु नये.तसेच कायद्याविषयीची जेवढी माहिती द्यायला हवी तेवढी देण्याचा प्रयत्न केला आहे तरी चुकीने काही राहिल्यास त्या कोणत्याही त्रुटींसाठी कंपनी जबाबदार असणार नाहीत.धन्यवाद !