Bombay Police Act 1951 in Marathi(Section:64), मुबंई पोलिस अधिनियम १९५१ कलम : ६४ , Bombay Police Act Marathi

Posted  on 2016-02-16

Bombay Police Act 1951 in Marathi(Section:64), मुबंई पोलिस अधिनियम १९५१ कलम : ६४ , Bombay Police Act Marathi
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त तसेच सर्व स्पर्धा परिक्षांसाठी उपयुक्त. Useful for police Sub Inspector Departmental Examination and also all competitive exam and Law students.
प्रकरण सहा
पोलीसांचे कार्यकारी अधिकार व कर्तव्य
कलम ६४ :
पोलीस अधिकाèयाची कर्तव्ये :

खालील कामे करणे हे प्रत्येक पोलीस अधिकाèयाचे कर्तव्य असेल:
क) सक्षम प्राधिकाèयाने त्यास वैधरीत्या(कायदेशीररीत्या) दिलेले प्रत्येक समन्स तत्परतेने बजावणे व प्रत्येक अधिपत्र किंवा इतर आदेश तत्परतेने पाळणे व बजावणे आणि आपल्या वरिष्ठ अधिकाèयाने वैधरित्या दिलेले समादेश अमलात आणण्याचा, सर्व वैध मार्गांनी प्रयत्न करणे;
ख) आपल्या संपूर्ण क्षमतेचा वापर करुन, घडलेल्या दखली अपराधासंबंधी किंवा तसे अपराध करण्याच्या हेतूसंबंधी गुप्त माहिती मिळविणे आणि अपराध्यांना न्यायासनासमोर(न्यायालयासमोर) आणण्यासाठी दखली अपराध व आपल्या दृष्टिपथात बिनदखली अपराध केला जाण्यास प्रतिबंध करण्यासाठी योग्य असेल अशी कायद्याशी आणि आपल्या वरिष्ठाच्या आदेशांशी सुसंगत(सारखी) असणारी माहिती देणे व अशी इतर उपाययोजना(व्यवस्था) करणे.
ग) आपल्या संपूर्ण क्षमतेचा वापर करुन, सार्वजनिक उपद्रव निर्माण होण्यास आळा घालणे;
घ) ज्या व्यक्तीस पकडण्यासाठी त्यास वैधरीत्या प्राधिकृत केले असेल आणि जीस पकडण्यास पुरेसे कारण असेल अशा सर्व व्यक्तींना गैरवाजवी विलंब न लावता पकडणे;
ङ) दुसरा कोणताही पोलीस अधिकारी आपले काम करते वेळी मदतीस बोलावील तेव्हा, किंवा त्याचे काम करते वेळी मदतीची गरज लागेल तेव्हा, अशी मदत ज्यास करावयाची त्या अधिकाèयाच्या बाबतीत वैध व वाजवी ठरेल अशा रीतीने मदत करणे;
च) त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही विधीनुसार त्याजकडे सोपविण्यात आलेली कर्तव्ये पार पाडणे.

परिक्षेसाठी संपुर्ण ऑडियो अ‍ॅप खालील लिंक वरुन डाउनलोड करा.
Android App With Audio and Text Link

या वेबसाईट वर कायद्याविषयीची माहिती,नियम,अधिनियम व इतर केवळ अभ्यासाकरिता उपलब्ध केली आहे. तरी याचा कायदेशीर कोठेही वापर करु नये.तसेच कायद्याविषयीची जेवढी माहिती द्यायला हवी तेवढी देण्याचा प्रयत्न केला आहे तरी चुकीने काही राहिल्यास त्या कोणत्याही त्रुटींसाठी कंपनी जबाबदार असणार नाहीत.धन्यवाद !