The Bombay Prohibition Act,1949 in Marathi, Section:2 - मुंबई दारुबंदी अधिनियम, १९४९ कलम : २ , Bombay Prohibition Act in Marathi

Posted  on 2016-02-16

The Bombay Prohibition Act,1949 in Marathi, Section:2 - मुंबई दारुबंदी अधिनियम, १९४९ कलम : २ , Bombay Prohibition Act in Marathi
प्रकरण १
प्राथमिक
कलम २ :
व्याख्या :

(२) ‘‘बाटलीत भरणेङ्कङ्कत्याचे व्याकरणदृष्ट्या होणारे फेरफार धरुन या शब्दप्रयोगाचा अर्थ विकण्यासाठी कोणताही पदार्थ qपपातून किंवा इतर भांड्यातून काढून तो बाटलीत, बरणीत, कुपींत,भांड्यात किंवा त्यासारखे पात्र यांत भरणे, असा असेल; मग त्यासाठी माल तयार करण्याच्या कोणत्याही प्रक्रियेचा उपयोग केला असो वा नसो; ‘‘बाटलीत भरणेङ्कङ्क या शब्दप्रयोग ‘‘पुन्हा बाटलीत भरणेङ्कङ्क असाच होतो.
(७) दारुचा गुत्ता(दारु पिण्याचे सामायिक ठिकाण) या संज्ञेचा अर्थ, जी कोणतीही जागा एखाद्या व्यक्तीच्या मालकीची असेल किंवा तिचा तो भोगवटा करीत असेल, वापर करीत असेल, ती ताब्यात ठेवीत असेल किंवा तिची व्यवस्था पाहत असेल किंवा तिच्यावर नियंत्रण ठेवीत असेल आणि जीत तिचा वापर केल्याबद्दल किंवा तिच्यात दारु पिण्याची सोय केल्याबद्दल आकार घेऊन किंवा अन्य कोणत्याही प्रकारे अशा व्यक्तीच्या फायद्यासाठी किंवा कमाईसाठी दारू पिण्याची किंवा कोणतेही मादक औषधी द्रव्य सेवन करण्याची परवानगी दिली असेल अशी जागा , असा समजावा ; व त्या संज्ञेत ह्या अधिनियमान्वे दिलेल्या लायसन्सवाचून एकापेक्षा अधिक व्यक्तीकहून दारू पिण्याकरिता किंवा कोणतेही मादक औषधी द्रव्य सेवन करण्याकरिता जिचा वारंवार उपयोग करण्यात येतो त्या क्लबच्या (ठिकाणाच्या)जागेचा किंवा कोणत्याही इतर जागेचा समावेश होतो.
(८) देशी दारु या संज्ञेत भारतात उत्पादन केलेल्या, किंवा तयार केलेल्या सर्व प्रकारच्या दारुचा समावेश होतो;
(१०) विप्रकृत म्हणजे मानवी(मनुष्य) सेवनास अयोग्य करण्याकरिता ज्यावर विहित केलेली क्रिया केली आहे;
(१०-अ) विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ(खाण्यास किंवा पिण्यास अयोग्य अमली पदार्थ) या संज्ञेचा अर्थ, विप्रकृत मद्यसार किंवा विप्रकृत मद्यार्क वापरुन केलेला कोणताही सिद्धपदार्थ असा समजावा; व तीत असे मद्यसार किंवा विप्रकृत मद्यार्क(अमली पदार्थ) यांपासून तयार केलेले लाखरोगण, फ्रेंच पॉलिश व वॉर्निश यांचा समावेश होतो;
(२२) मादक द्रव्य या संज्ञेचा अर्थ, कोणतीही दारु, मादक औषधी द्रव्य, अफू किंवा राज्य शासन शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे मादक द्रव्य म्हणून जाहीर करील असा कोणताही इतर पदार्थ, असा समजावा;
(२३) मादक औषधी द्रव्य म्हणजे-
(अ) भारतातील भांगेच्या झाडाची (कॅनॅबिस सॅटिव्हा एल) पाने, बारीक देठ व फुले किंवा फळे येणारी बोंडे, यात भांग, सिधी किंवा गांजा या सर्व प्रकारचा समावेश होतो;
(ब) चरस म्हणजे भारतातील भांगेच्या झाडापासून मिळणारी राळ, संवेष्टन व परिवहन यांसाठी आवश्यक असलेल्या क्रियेव्यतिरिक्त इतर कोणत्याही क्रिया ज्यावर करण्यात आलेल्या नाहीत अशी ;
(क) वरीलपैकी कोणत्याही प्रकारच्या मादक औषधी द्रव्याचे उदासीन पदार्थ घालून किंवा त्याशिवाय तयार केलेले कोणतेही मिश्रण किंवा त्यापासून तयार केलेले कोणतेही पेय;
(ड) राज्य शासन शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे ह्या अधिनियमाच्या प्रयोजनाकरिता मादक औषधी द्रव्य म्हणून जाहीर करील असे कोणतेही इतर मादक किंवा अमली औषधी द्रव्य किंवा पदार्थ व त्यापासून तयार केलेला पदार्थ किंवा मिश्रण हे अपायकारक औषधीद्रव्य अधिनियम, १९३०, कलम २ यात व्याख्या केल्याप्रमाणे अफू, कोका पान किंवा तयार केलेले औषधीद्रव्य असता कामा नये;
(२४) दारू या संज्ञेत-
(अ) मद्यसार विप्रकृत मद्यसार, वाईन, बीअर, ताडी आणि मद्यार्काचे बनलेले किंवा मद्यार्क असलेले सर्व प्रवाही पदार्थ; आणि
(ब) राज्य शासन शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे ह्या अधिनियमाच्या प्रयोजनाकरिता दारु म्हणून जाहीर करील असा कोणताही इतर मादक पदार्थ, यांचा समावेश होतो;
(३०) अफू या संज्ञेचा अर्थ-
(अ) खसखशीच्या (पॅपॅव्हर सॉम्निफेरम एल.) झाडांची बोंडे मग ती आपल्या मूळ स्वरुपात असोत किंवा कापलेली किंवा चुरा केलेली असोत किंवा त्यांची भुकटी केलेली असो आणि त्यांपासून रस काढून घेण्यात आला असो वा नसो;
(ब) संवेष्टन व परिवहन यांसाठी आवश्यक असलेल्या क्रियेव्यतिरिक्त इतर कोणतीही क्रिया ज्यावर करण्यात आलेली नाही असा स्वाभाविकपणे जमलेला अशा बोंडाचा रस; आणि
(क) वरीलपैकी कोणत्याही प्रकारच्या अफूचे गुणविरहित पदार्थ घालून किंवा त्याशिवाय तयार केलेले कोणतेही मिश्रण;
परंतु या संज्ञेत शेकडा ०.२ पेक्षा अधिक प्रमाणात मॉर्फीन नसलेल्या अशा कोणत्याही पदार्थाचा किंवा घातक औषधीद्रव्य अधिनियम, १९३०, कलम २ यात व्याख्या केल्याप्रमाणे तयार केलेल्या औषधीद्रव्याचा समावेश होत नाही.
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त तसेच सर्व स्पर्धा परिक्षांसाठी उपयुक्त. Useful for police Sub Inspector Departmental Examination and also all competitive exam and Law students.

परिक्षेसाठी संपुर्ण ऑडियो अ‍ॅप खालील लिंक वरुन डाउनलोड करा.
Android App With Audio and Text Link

या वेबसाईट वर कायद्याविषयीची माहिती,नियम,अधिनियम व इतर केवळ अभ्यासाकरिता उपलब्ध केली आहे. तरी याचा कायदेशीर कोठेही वापर करु नये.तसेच कायद्याविषयीची जेवढी माहिती द्यायला हवी तेवढी देण्याचा प्रयत्न केला आहे तरी चुकीने काही राहिल्यास त्या कोणत्याही त्रुटींसाठी कंपनी जबाबदार असणार नाहीत.धन्यवाद !