आगळ्या दुनियेतील वेगळ्या वाटा या चर्चासत्राद्वारे आम्ही आपल्या आजुबाजूला असणार्‍या काही आगळ्या वेगळ्या गोष्टी सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. अश्या गोष्टी की ज्या आपण शोधत तर असतो, त्याबद्दल नेमकी माहीती किंवा कल्पना नसते. या पहिल्या सत्राद्वारे आम्ही उज्वल भविष्याकडे वाट करणार्‍या युवा विद्यार्थ्यांसाठी खगोल शास्त्र या विषयाची वेगळी वाट दाखवत आहोत. जी आपल्या नव्या राष्ट्राच्या नव्या उभारणीसाठी, आपल्या युवा पिढीच्या भवितव्यासाठी गरजेची आहे.