जेंव्हा पासून आपल्या देशात लॉकडाऊन घोषित झाला आहे तेंव्हापासून ते आजपर्यंत आपले सरकार , पोलीस कर्मचारी , आणि संपूर्ण मेडिकल टीम . आपला जीव मुठीत धरून रोज ह्या संकटा बरोबर लढत आहे. तेंव्हा मी एक कलाकार म्हणून माझं काही योगदान आहे का ? असा प्रश्न स्वतःला नेहमी पडायचा आणि मग काहीतरी करायचे असे ठरवले. आणि मग सुरुवात झाली स्टोरी लिहायला ..आपण कलाकार आहोत आपण लोकांना जागृत करू शकतो , लोकांना सरकारी नियम आणखी चांगल्या प्रकारे समजावून /पटवून सांगू शकतो ह्या आशयाने मी हे लिखाण हाती घेतले. आजवर आपण नेहमी बऱ्याच गोष्टी दुसरीकडेच सापडत असतो, मुळात त्या तुमच्या कडेच असतात! ते म्हणतात ना काखेत कळसा आणि गावात वळसा ..! ह्या म्हणीचा मला प्रत्येय आला .आता हे गणित मला कधी जमले असते का? हे मला ठाऊक नाही.. पण ते कोणी तरी म्हटले आहे ना जे होते ते चांगल्या साठीच होते .. ! ते खरंय ...हो अगदी खरं आहे . जे समीकरण मला ह्या लॉकडाऊन मुळे जमले आहे ते लॉकडाऊन नसता तर ? ..माहीत नाही ? .. असो !.
ज्या प्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात त्याच प्रमाणे ह्या लॉकडाऊन च्या सुद्धा दोन बाजू आहेत एकीकडे नद्या ,तलाव स्वछ होत आहेत , प्रदूषण नियंत्रित होत आहे आणि माणसांना , पशूंना मिळालेला मोकळा श्वास , मोकळा वेळ जो आपन परिवरासोबात घालवत आहोत .. एकंदरीत मला तरी असा वाटते की आपण कुठल्याही संकटाकडे/वेळेकडे जसे पाहतो तसे आपल्याला दिसते.आणि दुसरीकडे ही महामारी.. अर्थातच ह्या दुसऱ्या बाजूचा जास्त प्रादूरभाव आहे.खूप लोक उपाशी पोटी मरत आहेत , खूप लोक आपल्या घरापासून दूर दुसऱ्या कामाच्या ठिकाणी अडकलेले आहेत आणि तेथील काम ही बंद पडले आहे, अश्याप्रकारच्या बऱ्याच अडचणींना आपण सध्या सामोरे जात आहोत. ह्या देशामध्ये हातावर पोट भागवणार्या लोकांची संख्या जास्त आहे . ते लोक कोणत्या त्रासातून जात असतील , त्यांच्या वेदना आपल्याला समजने गरजेचेच ..! तसेच जे लोक शहराच्या ठिकाणी नेकरी करत होते . इंजिनिअर असतील , सेल्समन असतील किंवा आणखी काही ईतर काम करणारे कर्मचारी असतील ..ह्या मधील बऱ्याच लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे .आणि नोकरी गेली म्हणजे नैराश्य येणे साहजिकच असते . आपल्या घरात आईबाबा, बायोको ,पोरं असतात पुण्यात घरासाठी काढलेले लोन असेल किंवा काही इतर गोष्टी.. हे एक उदाहरण झालं अश्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या माणसाला नैर्यशात घेऊन जात असतात .असो पण माणसाने प्रत्येक संकटाकडे /अडचणी कडे कश्या प्रकारे पाहिले पाहिजे , सामोरे गेले पाहिजे हेच मला ह्या प्रोजेक्ट मधून सांगायचं आहे .हो मला मान्य आहे ह्या लॉकडाऊन मूळे खूप लोक नैराश्या मध्ये गेलेली आहेत . पण काळ कसा ही असला तरी त्यावर मात कशी करायची हे मी सांगण्याचा एक छोटा प्रयत्न केला आहे ह्या प्रोजेक्ट /लघुपटा मधून केला आहे.
हा लघुपट का पहावा ? / लघुपटा मागची भूमिका.
मी प्रथमच लिखाण करत आहे .आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आणि तो ही घरातच राहून लॉकडाऊन च्या नियमांचे पालन करत आम्ही हा लघुपट बनवला आहे . आम्ही घरातच बसून हा लघुपट बनवला आहे . ह्या लघुपटातील सर्व कलाकार हे लिंबागणेश /बीड गावातील एक कुटुंब आहे . घरातीलच सदस्यांना घेऊन घरातच चित्रिकरन करण्यात आले आहे. आणि घरातील सदस्यांना कसलाही अनुभव नव्हता.आणि ह्या लघुपटा मधले सगळे शूट moblie द्वारे छायाचित्रीत करण्यात आले आहे . आता कुठलाही लघुपट असेल, सिनेमा असेल त्या साठी कॅमेरा हा steady हवा (वेगवेगळ्या angle ने शूट करावा लागतो) असतो म्हणजे तो सिन शूट करताना हलला नाही पाहिजे त्यासाठी आम्ही घरतल्याच वस्तूंचा वापर करून एक स्टँड बनवले एक टेबल , टूथ पेस्ट चा बॉक्स , cellotape, आणि मोबाईल असे समीकरण जुळवून आणले .तुम्ही लघुपट पाहिला असेल तर तुम्हला त्यात जी रंगभूषा केलेली दिसतेय ती माझ्या ताईनेच केलेली आहे .सर्व मेकअप च्या गोष्टी ज्या तिच्या कडे उपलब्ध होत्या त्याचा तिने योग्य तो वापर करून माझा मेकअप केला. मेकअप ला 45 मिनटे एवढा वेळ लागला . मेकअप किट , पॅन- केक ,कॉम्पॅक्ट पावडर, लिपस्टिक ,काजळ ह्या गोष्टींचा वापर करून मेकअप साधला आहे .ह्या फिल्म मध्ये आम्ही vfx चा वापर केला आहे . आणि ते पडद्यावर उतरवण्यासाठी विशेष सहकार्य आमचे दिग्दर्शक सचिन पिसाळ सर यांचे आहे . एका महत्वाच्या पत्रासाठी अजून एका कलाकाराची आवश्यकता होती पण मी गावाकडे असल्यामुळे आणि माझी कलाकार मंडळी पण आपल्याला आपल्या घरातच बसून असल्यामुळे मला ह्या मध्ये डबल पात्र करण्याची संधी मिळाली आणि ती vfx मूळ शक्य झाली.आम्हाला हा लघुपट तयार करायला अगदी सुरुवाती पासून 45 दिवस लागले. हा एक वेगळा अनुभव मला आला , जस की अपन सलमान खान चा जुडवा हा सिनेमा पहिला असेलच तश्या प्रकारचा अनुभव मला प्रथमच आला . अडचणी तर आल्याच अगदी संकल्पना सुचल्या पासून ते पडद्यावर उतरवण्या पर्यंत येत राहिल्या पण त्यावर उपाय शोधत , मात करत आम्ही हा लघुपट पूर्णत्वास नेला.
टीम :-
लेखक/अभिनेता : मयुर साळवे
दिगदर्शक / संकलक : सचिन पिसाळ
छायाचित्रण : सौरभ साळवे
संगीत : अक्षय डोलारे
रंगभूषा: पूजा साळवे -जंगमे
ध्वनी मुद्रण : सोमनाथ वैष्णव ,
नरेश गुंड
हा लघुपट खास माझ्या मित्रांसाठी ,भवांसाठी ,ताई ,माई ,अक्का साठी ,समाजातील प्रत्येकासाठी, विशेष जे नैराश्यामध्ये गेले आहेत त्यांच्यासाठी , त्यांच्या समर्थनासाठी , सामाजिक दृष्टीकोनाचे भान ठेऊन एक प्रयत्न करीत मी हा लघुपट घेऊन येत आहे आपल्या भेटीला .
लघुपटाचे नाव आहे लॉकडाऊन आणि मी Thank you
"Lockdown & I"
The day since lockdown has started in our country, all the police staff and medical team are working tirelessly day and night, risking their lives trying to make a change..make things better.
So as an artist, what should be my contribution to this? What could I do in this never known before crisis that has almost house arrested everyone? This thought kept going through my mind. I thought I could make people aware about this current situation in a creative way. So the writing stared.
As know that every coin has two sides, the same way, this lockdown also has two sides. At one side, it's all good, air has never been this pure, birds could fly freely in the fresh air, we can now spend quality time with our families.
While on the other hand, this pandemic has had a worst impact on people's lives around the world.
People below poverty line in India, are unable to have even a single meal in a day, no place to live, nobody to help them...we could hardly experience what they are going through.
And the people in urban areas, are facing their own lows at their level, some are getting jobless, some are clueless about how will they pay the loan.
We all know how important money is to live in this world and what could happen if we do not have it, naturally these things could lead to depression, anxiety.
And that's what I want to express through my project/short film that how one can face these challenges.
Ajinkya Innovations Presents
LOCKDOWN & I
Writer : Mayur Salve
Director & Editor : Sachin Pisal
Camera : Saurabh Salve
Music : Akshay Dolare
Make-up : Pooja Salve-Jangme
Sound : Somnath Vaishnav,
Naresh Gund